'सह्याद्री' मध्ये मधुमेहासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 03rd, 2009 AT 11:06 PM
पुणे - मधुमेही रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साह्याने उपचार करण्यासाठी सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेमध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस' सुरू करण्यात आले आहे. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह असलेल्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सह्याद्री रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. चारू आपटे, डॉ. जयश्री आपटे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. या केंद्राच्या प्रमुख मधुमेह तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलजा काळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्या म्हणाल्या, 'देशातील झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी हे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, ताण आणि आहार ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेहाची शक्यता असणाऱ्यांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या केंद्रातर्फे करण्यात येणार आहे. जुना मधुमेह असलेल्या रुग्णांना मूत्रपिंडविकार, हृदयविकार, न्यूमोनिया असे दुष्परिणाम होतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. मधुमेह प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभागही यात सुरू करण्यात आला आहे.
'मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या जखमांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत उपकरणे या केंद्रात आहेत. डोळ्यांसाठी स्वतंत्र विभाग आणि अद्ययावत अतिदक्षता विभागही येथे आहे,'' असे त्यांनी सांगितले.
मधुमेहावरील संशोधनही या केंद्रात सुरू आहे. याबाबत माहिती देताना डॉ. काळे म्हणाल्या, 'मधुमेही रुग्णांच्या पायांच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी येथे संशोधन सुरू आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (आयसीएमआर) अंतर्गत मधुमेहींच्या गुणसूत्रांची तपासणी करण्याचेही संशोधन सुरू आहे.''
मोफत तपासणी शिबिर
'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबेटिस'तर्फे येत्या 10 ते 20 जूनला सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेत आठशे मधुमेही रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी 9673338063 किंवा 9673338179 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.